नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये आपण खावटी अनुदान योजनेची Khavti Anudan Yojana 2022 माहिती समजून घेणार आहोत . खावटी अनुदान योजना ही नेमकी कुणासाठी आहे ? लाभ कसा मिळतो ? अर्ज कुठे करायचा ? याची संपूर्ण माहिती येथे समजून घेणार आहोत . लाभ पाहिजे असेल तर हा लेख आधी संपूर्ण वाचा . समजून घ्या . नंतर तुम्ही अर्ज करू शकता .
महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील आदिवासी बाधवांसाठी विविध योजना राबवित असते . त्यातली खावटी अनुदान योजना ही एक योजना आहे . या योजनेचा लाभ फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब व अनुसूचित जमातीच्या लोकाना दिला जातो . यामध्ये लाभार्थी यांना आर्थिक सहाय व अन्नधान्य दिले जाते , याची अधिक माहिती आपण खाली समजून घेणार आहोत .
Khavti Anudan Yojana 2022
सदर योजना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ , मर्यादित , नाशिक यांचेमर्फत राबविली जात असते . त्यासाठी राज्य शासन यांच्याकडून आदिवासी विकास महामंडळ यांना निधी उपलब्ध करून दिल जात असतो .
सन १९७८ ते २०१३ पर्यन्त राबविण्यात आलेल्या खावटी कर्ज योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील व्यक्ति संख्या नुसार अनुदान रक्कम ही वाटप करण्यात आली आहे .
योजनेचे नाव | खावटी अनुदान योजना Khavti Anudan Yojana 2022 |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | आदिवासी विभाग |
लाभार्थी | आदिवासी कुटुंबे |
लाभ | ४००० रुपये आर्थिक सहाय |
उद्देश | आदिवासी कुटुंबांना आर्थिक सहाय्य करणे |
WhatsApp ग्रुप | येथे क्लिक करा |
खावटी अनुदान योजनेचा उद्देश
- राज्यातील आदिवासी वर्गातील कुटुंबांना आर्थिक सहाय्य करणे .
- आदिवासी कुटुंबांचे राहणीमान उंचावणे .
खावटी अनुदान योजनेचा उद्देश Khavti Anudan Yojana 2022
- खावटी अनुदान योजनेमद्धे आदिवासी कुटुंबांना आर्थिक सहाय्य दिले जाते .
- खावटी अनुदान योजनेची अमलबजावणी ही महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ यांच्यामार्फत करण्यात येते .
- या योजनेमार्फत पात्र असणाऱ्या सर्व कुटुंबानं लाभ हा देण्यात येतो .
- या योजनेसाठी सुमारे ४८६ कोटी रुपयाचे बजेट निर्धारित करण्यात आले आहे .
- या योजनेचा लाभ पोस्ट खात्यांमध्ये दिला जातो . जर तुम्हाला बँक मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही तिथे सुद्धा घेऊ शकता .
खावटी अनुदान योजनेचे लाभार्थी
खावटी अनुदान योजनेचे लाभार्थी हे खालील प्रमाणे आहेत .
- मनरेगा मध्ये किमान एक rकार्यरत असलेले आदिवासी मजूर
- आदिवासी समाजाचे सर्व कुटुंबे
- पारधी जमातीचे सर्व कुटुंबे
- विधवा महिला
- भूमिहीन शेतमजूर
- अपंग व्यक्ति कुटुंब
- अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब
- वनहक्क प्राप्त असलेले कुटुंब
खावटी अनुदान योजनेमद्धे मिळणार लाभ
खावटी अनुदान योजना मध्ये अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना १०० % अनुदान हे दिले जाते . या योजनेमद्धे प्रती वर्षी ४००० रुपये अनुदान हे दिले जाते . Khavti Anudan Yojana 2022
यामध्ये जर तुम्हाला ४००० रु सरकार देणार असेल तर २००० रुपये तुम्हाला खात्या मध्ये जमा करून देते तर , उरलेल्या २ हजार रु चे अन्नधान्य दिले जाते . किंवा वस्तु ह्या वाटल्या जातात .
धान्य स्वरूपात करण्यात आलेली मदत
- मटकी
- चवळी
- हरभरा
- वाटाणा
- उडीद डाल
- तुरडाळ
- साखर
- तेल
- गरम मसाला
- मिरची पावडर
- नमक / मीठ
- चहापती
खावटी अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
खालील कागदपत्रे तुम्हाला खावटी अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत .
- अर्जदार यांचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- बँक पासबूक
- फोटो
- अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र
खावटी अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करावा
खावटी अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जावून ग्रामसेवक , किंवा तलाठी किंवा आदिवासी विकास कार्यालय किंवा शासकीय आश्रम शाळा येथे जावून तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
अश्या प्रकारे तुम्ही खावटी अनुदान योजनेचा लाभ घेवू शकता . मित्रांनो अश्याच प्रकारची माहिती पाहिजे असेल तर आपल्या WhatsAPP ग्रुप मध्ये नक्की सामील व्हा .