मित्रांनो या लेखामध्ये आपण Pandit Dindayal Upadhyay Yojana बद्दल माहिती घेणार आहोत . या योजनेमधून आदिवासी विद्यार्थी मित्रांना वर्षाला ६० हजार रुपये पर्यन्त लाभ हा मिळत असतो . तर नेमकी ही योजना काय आहे . हे आधी आपण समजून घेवू नंतर या योजनेसाठी अर्ज करू शकता .
Pandit Dindayal Upadhyay Yojana ओळख
Pandit Dindayal Upadhyay Yojana ही महाराष्ट्र शासन आदिवासी मुलांना शिक्षण घेता याव . त्यांना बाहेरगावी राहण्याची सोय व्हावी त्यासाठी वसतिगृह निर्माण केली आहेत . पण काही मुलांचा या योजनेसाठी नंबर लागत नाही . म्हणून पंडित दीनदयाळ योजणेचाच भाग एक ही योजना आहे . या योजनेमद्धे विद्यार्थी मित्रांना राहण्याचा खर्च हा दिला जातो .
त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो . हा भरलेला अर्ज शाळा /कॉलेज मध्ये जमा करावा लागतो . तसेच आदिवासी विकास भवन ला सुद्धा एक कॉपी जमा करावी लागते . लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला शाळेतील / कॉलेज मधील हजेरी पूर्ण पाहिजे .

त्यानंतर तुम्हाला वर्ष अखेर तुम्हाला या योजनेचा लाभ तुमच्या खात्यावर जमा करून दिला जातो . तर या योजनेसाठी काय पात्रता आहे ? कागदपत्रे कोणती लागणार ? अर्ज कसा व कुठे करायचा याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे .
कागदपत्रे
- आधार कार्ड असणे आवश्यक
- जातीचा दाखला
- उत्पन्न दाखला
- १० वी / १२ वी / पदवी चे मार्कशीट
- मेडिकल प्रमाणपत्र
- शाळा कॉलेज बोनफाईड / शिफारस
- मोबाईल नंबर जीमेल खाते
- बँक खाते
वरील कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा अर्ज भरतेवेळी लागणार आहेत .
पात्रता
या योजनेसाठी खालील पात्रता तुम्हाला पूर्ण करावी लागेल .
- मागील वर्षी परीक्षेत उत्तीर्ण असावे.
- अर्जदार हा अनुसूचित जमाती मधील असावा .
- अर्जदारकडे जातीचा दाखला असावा .
- वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये पेक्षा कमी असावे .
- अर्जदारचे आई-वडील सरकारी सेवेत नसावेत .
अर्ज कसा करावा ?
अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे . त्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करायच्या आहेत .
- पहिल्यांदा https://swayam.mahaonline.gov.in/Registration/Registration या वेबसाइटवर यायचे आहे . आणि नवीन नोंदणी करायची आहे .
- नवीन नोंदणी करून झाल्यावर लॉगिन करून अर्ज भरायचा आहे .
- अर्ज भरून झाल्यावर प्रिंट काढायची आहे . एक कॉपी शाळा / कॉलेज मध्ये आणि एक कॉपी आदिवासी विकास भवन मध्ये जमा करायची आहे .
अश्या प्रकारे या योजनेचा अर्ज भरू शकता . जर काही अडचण असेल तर कमेन्ट करून सांगा . तुम्हाला नक्की मदत केली जाईल