Soil testing: माती परीक्षणाचे फायदे काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का ?
Soil testing आपण ज्या शेतीतून जमिनीतून पिके घेतो. त्या जमिनींचा प्रकार कोणता व त्या जमिनीत कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत, या सर्व गोष्टींची माहिती करून घ्यायची असेल तर किमान 1 वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करणे गरजेचे असते. माती परीक्षण ही शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण आहे.
Soil testingयाद्वारे शेतात घेण्यात येणारे पीक नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. तसेच याने पीकांना द्यावयाच्या खताची मात्रा पण निश्चित करता येते. यामध्ये नत्र पालाश व स्फुरद या पोषक द्रव्यांचा दिलेल्या मातीच्या नमून्यात किती प्रमाण आहे हे बघितल्या जाते तसेच जमिनीतील विद्राव्य क्षार व जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक याचीही तपासणी केली जाते.
Soil testingपिकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. सामू PH विदयुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3, सेंद्रिय कर्ब Organic Carbon, नत्र N, स्फुरद P. पालश K, फेरस (आयर्न) Fe, झिंक Zn, मॅगनीज् Mn, सल्फर S, Boron B त्यापैकी एखादे जरी मातीत कमी किंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम लगेचच झाडावर दिसून येतो जसे पाने पिवळी पडणे, पान गळणे शिरा सोडून इतर पीकांची वाढ पूर्ण होत नाही.
माती परीक्षण म्हणजे का्य
शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यावयाच्या खताची मात्रा ठरवता येते, व त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. माती परीक्षण करून त्यानुसार केलेल्या लागवडीमुळे पिकांपासून दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळवता येतो. माती परीक्षणाच्या नोंदी राखणाऱ्या पत्रिकेस 'मृदा आरोग्य पत्रिका' असे नाव आहे.
Soil testingकाय-काय परीक्षण करण्यात येते
सर्वसाधारण नमुने
यामध्ये नत्र, पालाश व स्फुरद या पोषक द्रव्यांचा दिलेल्या मातीच्या नमुन्यात किती प्रमाण आहे हे बघितले जाते. तसेच जमिनीतील विद्राव्य क्षार व जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक याचीही तपासणी केली जाते.
सूक्ष्म मूलद्रव्य नमुने
यात शेतातील मातीत असणाऱ्या तांबे, लोह, मॅंगनीज, जस्त या सूक्ष्म मूलद्रव्यांची तपासणी करतात.
विशेष परीक्षण
यात मुक्त चुना, सेंद्रिय कर्ब, आर्द्रतेचे प्रमाण, कायिक गुणधर्म आदी गोष्टी तपासण्यात येतात. तसेच मातीत असलेल्या जाड रेती, बारीक रेती, चिक्कण माती, पोयटा आदी घटकांचे शेकडा प्रमाण काढले जाते.त्यासोबतच आम्ल-विम्ल निर्देशांक, मातीची विद्युत वाहकता,कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम (पालाश), स्फुरद आदी घटकांचीही तपासणी करण्यात येते.
यासमवेतच शेतातील विहिरीच्या किंवा नमुना दिलेल्या पाण्यात आढळणाऱ्या विविध खनिजांचे व घटकांचे प्रमाणही काढले जाते.