कसा आहे कुसुम सोलर पंप योजनेचा कोठा | Pm kusum Quota 2022

JSON Variables

कसा आहे कुसुम सोलर पंप योजनेचा कोठा | Pm kusum Quota 2022

कसा आहे कुसुम सोलर पंप योजनेचा कोठा | Pm kusum Quota 2022

Kusum Solar Pump Yojana 2022 नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवासाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. केंद्र शासनाने शेतकरी बांधवासाठी विजे पासून सुटका केलेली आहे. म्हणजेच सौर पंप अर्थातच त्यालाच आपण म्हणू शकतो कुसुम सोलर पंप योजना ही योजना शेतकन्याना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Kusum solar pump yojana Maharashtra 2022

तर यामध्ये 90% ते 95% टक्के अनुदानावर आपण 3 एचपी ते 7.5 Hp करिता अनुदान घेऊ शकता 90 ते 95 टक्के अनुदान आहे तर या यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. यामध्ये सपूर्ण माहिती या लेखात आपण दिलेले आहे. किती शेतजमीन धारकास किती Hp चा पूप दिला जातो. किंवा कोणता प्रवर्गासाठी किती अनुदान दिल जात तर त्यासाठी अर्ज कसा करायचा. कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे. या योजनेचे फायदे काय आहे संपूर्ण माहिती या लेखात आपण दिलेली आहे. जेणेकरून संपूर्ण माहिती वाचा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा.

कसा आहे कुसुम सोलर पंप योजनेचा कोठा

Kusum solar pump yojana Maharashtra 2022

मित्रानो शेतकरीना दिवसा सिंचन शक्य व्हावे यासाठी सौर कृषी पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता करून देण्यासाठी देशांमध्ये कुसुम सोलर पंप योजना ही योजना राबवली जात आहे त्याच्या अंतर्गत पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये पाच लाख कुसुम सोलर पंप देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले 

त्याच्यानंतर २०२२-२३  या वर्षामध्ये एक लाख सौर कृषी पंप दिले जाणार आहेत केंद्र शासनाच्या माध्यमातून 30 टक्के निधी शासनाच्या माध्यमातून 30 टक्के निधी इत स्रोत त्याच्या माध्यमातून 30 टक्के आणि लाभार्थीचे 10 टके निधि अशा प्रमाणामध्ये राबवली जात आहे याची योजनेच्या अंतर्गत पहिला टप्पा 750 पंप दूसरा टप्पा 50000 चा या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे आणि या पन्नास हजाराच्या टप्प्यानंतर पुढे पन्नास हजार पंप पूर्ण करुण 2022 मध्ये साधारणपणे राज्यांमध्ये एक लाख सोलर पंप देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आपण पाहिलेला शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात योजनेकडे ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर तात्काळ काही तासांमध्ये काही मिनिटांमध्ये अर्जुन पूर्ण होतात कोटा पूर्ण होतो.

Kusum solar pump yojana Maharashtra 2022

यामध्ये मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. लातूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात ५०,००० च्या वर तर औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी जिल्ह्यात जवळपास 34 हजारांवर नोंदणी,अर्ज प्राप्त झाले आहेत.

यापैकी पात्र झालेल्या १३,३०० लाभार्थ्यांना हिस्सा भरण्यासाठी एसएमएस द्वारे कळविण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना पैशाचा भरणा करण्यासाठी अंतिम मुदत ही ३१ मे २०२२ असणार आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आपला ऑनलाईन लाभार्थी हिस्सा भरावा लागणार आहे.

शेतकरी आपला लाभार्थी हिस्सा ऑफलाईन पध्द्तीने DD काढून जवळच्या महाऊर्जा यांच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.

Kusum solar pump yojana Maharashtra 2022

शेतक-यांना कुसुम सोलर (pm kusum ) च्या या पोर्टल वर अर्ज करण्यास, लाभार्थी हिस्सा भरण्यास किंव्हा कंपनी निवड करण्यास अडचणी आल्यास महाउर्जा च्या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी ०९:३० ते सायंकाळी १७:३० संपर्क करावा अशे आवाहन महाऊर्जा कडून करण्यात आले आहे

पहिल्या टप्प्या अंतर्गत लातूर विभागातील 513 सौर कृषी पंप बसण्याचं काम पूर्ण झाले तर औरंगाबाद विभागीय कार्यालयांतर्गत 721 सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत.

Kusum solar pump yojana Maharashtra 2022

तर या योजनेच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत राज्यात 50 हजार सौर कृषी पंप बसविले जाणार आहेत.

मात्र अहमदनगर, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, पुणे, सोलापूर, वाशिम, जळगाव आणि यवतमाळ या जिल्ह्यात अधिक नोंदणी झाली असल्याने कोठा पूर्ण झाला आहे

Kusum solar pump yojana Maharashtra 2022

तर अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये कोठा शिल्लक असल्याने सौर कृषी पंप नोंदणी सुरू आहे, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन देखील महाऊर्जा कडून करण्यात आलेल

इथे क्लिक करुण सविस्तर माहिती पाहा