फळपीक विमा नोंदणीला सुरुवात अशी करा नोंदणी | Fal Pik Vima Yojana 2022

JSON Variables

फळपीक विमा नोंदणीला सुरुवात अशी करा नोंदणी | Fal Pik Vima Yojana 2022

 


Fal Pik Vima Yojana 2022 फळपिक विमा योजनेअंतर्गत सरकारने आता पुन्हा ऑनलाईन अर्ज सुरु केले आहे. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय दिलेला आहे. या शासन निर्णय मध्ये सरकारने कोणत्या फळावर अर्ज करण्यासाठी किती मुदतवाढ दिलेले आहे. त्याच बरोबर कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अशी संपूर्ण माहिती दिलेली आहे. यामुळे तुम्ही शासनाचा हा महत्त्वपूर्ण मेसेज नक्की वाचा.

हे पण पाहा 👉 MahaDBT योजना लॉटरी नंतर बियाणे कसे मिळणार? Pdf Dawnlode kara 2022 

 त्याचबरोबर आपल्याला या बातमीमध्ये पाहायला मिळणार आहे की, या योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा व कुठे भरायचा याची संपूर्ण माहिती देखील आम्ही या बातमीमध्ये दिलेली आहे. 

फळपीक विमा योजना 2022

शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्या पासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधीत राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुर्नरचित हवामान आधरित फळपिक विमा योजना राबविण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परीणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते. 

पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना राज्यात सन २०२१-२२, २०२२-२३ व २०२३-२४ या तीन वर्षामध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, चिकू, पेरू, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) (मृग बहार) या ८ फळपिकांसाठी २६ जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक घरुन एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि., रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि. व भारतीय कृषि विमा कंपनी लि. या विमा कंपन्यांमार्फत संदर्भ क्र. २ मधील शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. 

 "चालू हंगामातील नोंदणी सुरु असतानाच विमा संरक्षित क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध नसली तरी देखील केंद्र व राज्य शासनाचा विमा हप्ता हिस्सा अग्रीम स्वरुपात (पहिला हप्ता) कंपनीस अदा करणे आवश्यक आहे. 

सदर विमा हप्ता अनुदानाची रक्कम मागील हंगामाच्या अदा केलेल्या एकूण राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाच्या ८० टक्क्याच्या ५० टक्के रक्कम आगामी स्वरुपात कंपन्यांना द्यावी" असे नमूद आहे. त्यास अनुसरून कृषि आयुक्त कार्यालयाने केलेल्या विनंतीनुसार रु. ३०,०६,०३,४०५/- इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

आवश्यक कागदपत्रे व शासन चनर्रय


 बिगर कर्जदारांना सहभाग घ्यायचा असल्यास ही कागदपत्रे गोळा करावी.

• आधार कार्ड
• सातबारा 
• आठ अ उतारा 
• पीक लागवडीचे स्वयंघोषणापत्र 
• फळबागेचा टॅगिंग चिन्हांकित केलेले छायाचित्र
• बँकेचे खातेपुस्तक

शासन निर्णय : 

भारतीय कृषि विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषि आयुक्तालयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्र. १३.१.६ या बाबींचा विचार करून पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना मृग बहार सन २०२१ अंतर्गत राज्य हिस्सा पिक विमा हप्ता अनुदानाच्या प्रथम हप्त्यापोटी रु.३०,०६.०३,४०५/- इतके अनुदान विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरची रक्कम मृग बहार हंगाम २०२१ करीता वितरीत करण्यात येत असून त्याचा वापर इतर हंगामाकरीता अनुज्ञेय असणार नाही.

नोंदणी प्रक्रिया -

केंद्र सरकारच्या https://pmfby.gov.in संकेतस्थळावर विमा नोंदणी करता येईल. तसेच विविध प्रकारची ई-सेवा केंद्रे, बँकांमार्फत देखील सहभाग नोंदवता येईल. कृषी विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विमा कंपन्या व जिल्हे, कंपन्यांच्या तालुका प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. Fal Pik Vima Yojana Maharashtra Online Form

gr Pdf Download kara 2022  👉   click hear