विवाह नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइन कसे काढावे व त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे marriage certificate Maharashtra 2022
Marriage certificate: आपण पाहतो की लग्न झाल्यानंतर आपण विवाह नोंदणी करावी असे बरेच जण म्हणत असतात. विवाह नोंदणी कशी करावी आपण या लेखात जाणून घेणार आहोत
👉विवाह नोंदणी प्रमाणपत्र का्य आहे Marriage certificate
Marriage certificate लग्नाच्या बेडीत अडकल्या नंतर विवाह प्रमाणपत्र हे वधू आणि वरांच्या वैवाहिक बंधनाचे कायदेशीर प्रमाणपत्र देणारा दस्तऐवज आहे. ऑनलाइन सेवे द्वारे व जिल्हा विवाह निबंधक धार्मिक विवाह आणि विशेष विवाह कायद्यानुसार विवाह प्रमाणपत्र देण्यात येते
हे पण पाहा 👉Diesel pump subsidy डिझेल पंप खरेदी करण्यासाठी मिळणार अनुदान तात्काळआपला अर्ज करा 75 टक्के मिळणार
मित्रांनो, whatsapp ग्रुप Join करा
👉आवश्यक कागदपत्रे
👉वधू व वर यांचा रहिवासी पुरावा (उदा. रेशन कार्ड, दूरध्वनी बिल, वीज बिल, पासपोर्ट यांच्या मूळप्रतीसह सत्यप्रती).
👉वधू आणि वर यांच्या वयाचा दाखला (उदा. शाळा, सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यांच्या मूळप्रतीसह सत्यप्रती).
👉लग्नविधी प्रसंगीचा फोटो, लग्नाची पत्रिका, लग्नाची पत्रिका नसल्यास ॲफिडेव्हिट द्यावे लागते. तसेच विवाह नोंदणी अर्जावर लग्न लावलेल्या पुरोहिताची स्वाक्षरी आवश्यक असते.
👉तीन साक्षीदारांचे रहिवासी पुरावे (उदा. रेशनकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र यांच्या मूळप्रतीसह सत्यप्रती).
वर आणि वधू घटस्फोटित असल्यास कोर्टाच्या हुकूमनाम्याची सत्यप्रत.
👉वर-वधू , विधुर-विधवा असल्यास संबंधित मृत व्यक्तीच्या मृत्यूचा मूळ दाखला सत्यप्रतीसह.
👉वधू आणि वर यांच्या वयाचा दाखला (उदा. शाळा, सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यांच्या मूळप्रतीसह सत्यप्रती).
👉लग्नविधी प्रसंगीचा फोटो, लग्नाची पत्रिका, लग्नाची पत्रिका नसल्यास ॲफिडेव्हिट द्यावे लागते. तसेच विवाह नोंदणी अर्जावर लग्न लावलेल्या पुरोहिताची स्वाक्षरी आवश्यक असते.
👉तीन साक्षीदारांचे रहिवासी पुरावे (उदा. रेशनकार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र यांच्या मूळप्रतीसह सत्यप्रती).
वर आणि वधू घटस्फोटित असल्यास कोर्टाच्या हुकूमनाम्याची सत्यप्रत.
👉वर-वधू , विधुर-विधवा असल्यास संबंधित मृत व्यक्तीच्या मृत्यूचा मूळ दाखला सत्यप्रतीसह.
Marriage certificate प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:-
विवाह नोंदणी प्रमाणमत्र ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी आपले सरकारची खाली दिलेली वेबसाईट ओपन करायची आहे.Marriage certificate
त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिका करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरून नोंदणी करावी लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर नोंदणी कशी करायची? हे आपण मागील लेखामध्ये पाहिले आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकून लॉगिन करायचे आहे.
त्यानंतर आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या अजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला असेल. त्यामधील तुम्हाला सोयीस्कर असलेली भाषा निवडा. त्यानंतर डाव्या बाजूला शासनाच्या विविध सेवा येतील त्यातील ग्राम विकास व पंचायत राज हा पर्याय निवडा.
हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मुत्यूचा दाखला, जन्म नोंद दाखला असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील विवाह नोंद दाखला या पर्यायावर क्लिक करून नंतर पुढे जा वर क्लिक करा.
पुढे ग्रामविकास विभागाची वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये विवाह नोंद दाखला या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
Marriage certificateअर्जदाराची माहिती-
1) तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका व गावाचे नाव टाकायचे आहे.
2) त्यापुढील रकान्यामध्ये वराचे संपूर्ण नाव, विवाह दिनांक आणि विवाहाचे ठिकाण टाकायचये आहे.
पुढे तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक दिसेल तिथे ओके या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर खाली अपलोड डॉक्युमेंट्स हा पर्याय निवडा. तिथे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे.
त्यानंतर परत अपलोड डॉक्युमेंट्स वर क्लिक करा व नंतर येणार्या मेसेज वर ओके या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमची सर्व कागदपत्रे सेव्ह होतील.
यानंतर शासनाचे चलन भरायचे आहे, त्यासाठी पेटीएम किंवा एटीएम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा वापर करू शकता.
चलन भरल्यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी आपले सरकार या पेजवर लॉगिन करून मुखपृष्ठ तपासा, त्यामध्ये भरलेल्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर त्याबद्दल तुम्हाला काही सांगण्यात आले आहे का? असे असल्यास तुमचा अर्ज नाकारला जाईल.
विवाह प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर तुमचं नाव, अर्ज क्रमांक तसेच प्रमाणपत्र डाउनलोड करा असे पर्याय दिसतील तिथून तुम्ही प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता.
हे प्रमाणपत्र मिळण्याचा कालावधी पाच दिवसांचा आहे. हे प्रमाणपत्र ग्रामसेवक तुम्हाला देत असतो. या कागदपत्रांवरती कुठेही सही व शिक्का घेण्याची गरज नसते कारण यावर आधीच तुमच्या ग्रामसेवकांची डिजिटल सही असते.
Tags
how to apply for marriage certificate online in maharashtra Q marriage certificate online process
marriage certificate online process
download marriage certificate online
court marriage procedure in maharashtra
marriage registration
marriage certificate mumbai
marriage certificate online
how to take appointment for marriage certificate
marriage certificate online steps
marriage certificate application form
how to apply for marriage certificate online in maharashtra Q marriage certificate online process
marriage certificate online process
download marriage certificate online
court marriage procedure in maharashtra
marriage registration
marriage certificate mumbai
marriage certificate online
how to take appointment for marriage certificate
marriage certificate online steps
marriage certificate application form