भ्रष्टाचार विरुद्ध लढण्याचे अवजार म्हणजे “ माहिती अधिकार कायदा ” . माहिती अधिकार कायद्यामुळे तुम्हाला जी माहिती आमदार , खासदार मागवु शकतात ती सर्व माहिती तुम्ही सुद्धा माहिती अधिकार कायदा वापरुन मागवु शकता . कशी मागवायची याची माहिती तुम्हाला खाली दिली आहे .
मित्रांनो सर्वात आधी आपण माहिती अधिकार कायद्याची ओळख करून घेवू . त्यानंतर आपण जर भ्रष्टाचार होत असेल तर अर्ज कसा करायचा याची माहिती जाणून घेणार आहोत .
माहिती अधिकार कायदा काय आहे ?
माहिती अधिकार कायद्या मध्ये तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मागविता येते . जर तुमच्या गावातील / शहरातील रस्ता बांधकाम बोगस झाले असेल , पैसे खाल्ले असतील , असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माहिती अधिकार वापरू शकता . “माहितीचा अधिकार अधिनियम २००५ ” हा कायदा २००५ साली अस्तित्वात आला . हा कायदा जगात लागू करणार “स्वीडन” हा पहिला देश आहे .
माहितीचा अधिकार कायदा लागू होण्यापूर्वी लोकाना सरकारी कामाचा योग्य ठिकाणी खर्च झाला का नाही याची माहिती मिळत नव्हती . त्यामुळे भरपूर भ्रष्टाचार होत असून सुद्धा लोकाना आवाज उठवता येत नव्हता .भारत हा ७१ वा माहिती अधिकार कायदा देणार देश आहे . भारत देशात पहिल्यांदा तामिळनाडू राज्याने हा कायदा लागू केला .
माहितीचा अधिकार कायदा अस्तित्वात आल्यामुळे सरकार वर वचक बसायला सुरवात झाली आहे . भारत देशयामद्धे हा कायदा सर्वात जास्त वेळा वापरला गेला आहे . दररोज ४००० पेक्षा जास्त अर्ज हे माहिती मिळवण्यासाठी केले जातात .
माहिती अधिकारचे फायदे -Mahiti adhikar form Download
माहिती अधिकारचे भरपूर असे फायदे आहेत . ते खालील प्रमाणे आहेत .
- माहिती अधिकारमुळे तुम्हाला आमदार , खासदार यांना जी माहिती मागविता येते . ती माहिती तुम्ही सुद्धा मागवु शकता .
- जर तुमच्या ग्रामपंचायत / नगरपंचायत / महानगरपालिका मध्ये घोटाळा झाला आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माहिती अधिकार वापरुन त्यांना अद्दल घडवू शकता .
- सरपंच / उपसरपंच / ग्रामपंचायत सदस्य यांनी घोटाळा केला आहे तर त्यांना सुद्धा तुम्ही चांगला धडा या कायद्यामार्फत शिकवू शकता .
- आमदार / खासदार यांनी घोटाळा केला असे वाटत असेल तर त्यांच्यावर सुद्धा माहिती अधिकार वापरू शकता .
- तुमचे नाव घरकुल ड यादी मध्ये का नाही याची सुद्धा विचारणा तुम्ही माहिती अधिकार कायद्या अंतर्गत करू शकता .
- गावात जर एखादे बांधकाम झाले असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की या काममद्धे घोटाळा किंवा ठेकेदार यांनी पैसे खाल्ले असतील असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांना सुद्धा अद्दल घडवून आणू शकता .
- शाळेमध्ये जर एखाद्या योजनेसाठी अनुदान दिले जात असेल, पण त्याचा लाभ हा विद्यार्थी यांना होत नसेल तर तुम्ही माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती काढून तक्रार करू शकता .
मित्रांनो असे भरपूर माहिती अधिकार कायद्याचे फायदे आहेत . त्यामुळे या कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे .
माहिती अधिकार अर्ज कसा करावा ?
माहिती अधिकार अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहेत . त्या खालील प्रमाणे आहेत .
- ऑफलाइन पद्धत
- ऑनलाइन पद्धत
ऑफलाइन पद्धत
मित्रांनो या पद्धतीने जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज हा कोणत्याही एका कागदावर हाताने लिहून किंवा प्रिंट / झेरॉक्स केलेला अर्ज करू शकता . अर्ज नमुने तुम्हाला खाली दिले आहेत .
जर तुम्हाला ग्रामपंचायत चा ऑडिट रीपोर्ट मागवायचा असेल तर खालील प्रमाणे रीपोर्ट मागवु शकणार आहात . तुम्ही हाताने सुद्धा लिहून अर्ज करू शकता किंवा खालील अर्जाची प्रिंट काढून घेवू शकता .

मित्रांनो खालील अर्ज हा तुम्ही कोणत्याही माहिती साठी वापरू शकणार आहात

अश्या प्रकारे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात . अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेन्ट करून तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता .
ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करायचा ?
मित्रांनो ऑनलाइन पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाइल वरुण अर्ज करू शकता त्याची लिंक ही तुम्हाला खाली दिली आहे . यासाठी तुम्हाला गूगल वरती जावून आवशक ती विचारलेली माहिती भरून तुम्ही अर्ज करू शकणार आहात .
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक :- येथे क्लिक करा
माहिती अधिकार अर्ज करताना कोणती काळजी घ्यावी ?
माहिती अधिकार अर्ज करताना तुम्हाला कळेल अश्या अक्षरात अर्ज करायचा आहे . तुम्ही जी माहिती माहिती मागविणार आहात त्या माहितीचे वर्णन स्पष्ट करा . अर्ज हा एकाच व्यक्तीच्या नावाने असला पाहिजे . संस्था किंवा व्यक्ति यांच्या नावाने अर्ज करता येणार नाही . एका अर्जात एकच विषय असावा . आपण मागविलेली माहिती जर जास्त असेल तर जीमेल किंवा सीडी द्यावारे मागवा म्हणजे तुम्हाला खर्च कमी येणार आहे . mahiti adhikar form download
कोणती माहिती तुम्ही मागवु शकणार नाही ?
देशाचे सार्वभौमत्व, एकात्मता, राज्याची सुरक्षा, युद्ध तंत्र विषयक, वैज्ञानिक किंवा आर्थिक हीतसंबंध तर राज्य तसेच देशाला ज्या माहितीने बाधा किंवा नुकसान पोहचेल किंवा अपराधाला वाव मिळेल इ. माहिती संबंधित अधिकारी कडून पुरवली जात नाही.
माहिती किती दिवसात मिळते ? mahiti adhikar form download
माहिती ही तुम्ही अर्ज केल्यापासून पुढील ३० दिवसांच्या आत तुम्हाला मिळते . जर मिळाली नाही तर तुम्ही तक्रार सुद्धा करू शकता .
मित्रांनो अश्या प्रकारे तुम्हाला माहिती अधिकार कायदा नेमकी काय आहे हे कळले असेलच . मित्रांनो जर तुम्हाला अश्याच प्रकारची माहिती पाहिजे असेल तर आपल्या WhatsApp Group मध्ये नक्की सामील व्हा . जय महाराष्ट्र