नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण "प्रधानमंत्री पीक विमा योजना " याचा अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती बघणार आहोत . जर तुम्ही ग्रामीण डाक सेवक असाल किंवा CSC केंद्र चालक असाल तर खालील माहिती तुम्हाला खूप महत्वाची ठरणार आहे . चुकीचा पीक विमा अर्ज भरू नक्का. अचूक विमा भरण्यासाठी तुम्हाला खालील पद्धतीने पीक विमा भरायचा आहे .
पीक विमा भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे ✔
खालील कागदपत्रे विमा भरणे साठी लागणार आहेत .
- आधार कार्ड
- बँक पासबूक
- ७/१२ किंवा ८ अ ( ऑनलाइन मोबाइल वरुण डाउनलोड करू शकता येथे क्लिक करा )
- स्वयंघोषणापत्र ( डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा ) प्रिंट काढून घेणे.
वरील कागदपत्रे आधी आहेत का ते बघा . तुमच्या मोबाइल मध्ये Adobe Scan हे app वापरुन कागदपत्रे फोटो (स्कॅन )करून घ्या . नंतर फॉर्म भरण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा .
पीक विमा भरणे स्टेप्स
- सगळ्यात आधी https://pmfby.gov.in/ या वेबसाइट वर यायचे आहे .
- यामध्ये तुम्हाला CSC Login या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे .
- तुमचा CSC ID आणि Password टाकून लॉगिन करायचे आहे .
- महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचे आहे .
Maharashtra | 2022 | Kharif | Pradhan mantri fasal bima yojana |
- वरील प्रमाणे तुम्हाला सेलेक्ट करायचे आहे . Submit या बटणावर क्लिक करायचे आहे .

- 'Application Form " या ऑप्शन वर क्लिक करा .
- त्यानंतर तुम्हाला बँक माहिती भरायची आहे . आणि पुढील page वर जायचे आहे . खालील प्रकारे माहिती भरायची आहे .
- Farmer Details मध्ये सर्व माहिती खालील प्रमाणे भरा .

पिकाची माहिती खालील प्रमाणे भरा .

कागदपत्रे अपलोड करा . खालील प्रमाणे . कागदपत्रे साइज 500 kb पेक्षा जास्त नको .

त्यानंतर तुम्हाला priview या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज तपासून पाहायचा आहे . त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचे आहे . तुम्हाला csc id मध्ये पैसे add करावे लागनार आहेत . तुमचा पासवर्ड टाकून पेमेंट करा .
जर तुम्हाला शेतकरी यांना विमा भरल्याची पावती द्यायची असेल तर , सबऑफिस मधून प्रिंट काढून संबधित शेतकरी यांना देणे .
जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर आपल्या whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा . तेथे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती ही देण्यात आली आहे .
पीक विमा भरतांना कोणती काळजी घ्याल .
- चुकीची माहिती टाकू नक्का .
- मोबाइल नंबर शेतकरी मित्राचाच टाका . नाहीतर शेतकरी यांना नंतर प्रॉब्लेम येतो .
- फॉर्म भरायला चुकल्यास पैसे शेतकरी यांच्या खात्यावर 2-3 महिन्यात जमा केले जातात . त्यासाठी फॉर्म भरावा लागतो .
- अॅप्लिकेशन Approve झाले आहे का ही तपासून बघा .