पिकाची नुकसान झाली असेल तर अशी नोंदवा तक्रार | पीक नुकसान झाल्याची सूचना द्या -विमा कंपनी

JSON Variables

पिकाची नुकसान झाली असेल तर अशी नोंदवा तक्रार | पीक नुकसान झाल्याची सूचना द्या -विमा कंपनी

 मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये पीक विमा भरायला 1 जुलै पासून सुरवात झाली आहे . प्रधानमंत्री पीक विमा योजना "बीड पॅटर्न " या योजनेला शेतकरी सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत . पीक भरायचा असल्यास लवकरात लवकर भरून घ्या . अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 जुलै 2022 ही ठेवण्यात आली आहे . 


"प्रधानमंत्री पीक विमा योजना " यामध्ये पिकाची नुकसान झाल्यास शेतकऱ्याला पीक विमा हा दिल जातो . नेसर्गिक आपत्ति , पुर , वादळ अति पाऊस यामुळे जर पिकांची नुकसान झाली तर विमा हा दिला जातो . तर पिकाची नुकसान झाल्यास विमा कंपनी ला सूचना देणे आवश्यक आहे . तर सूचना कशी दद्यायची किंवा पीक नुकसान झाल्याची तक्रार कशी नोंदवायची याची संपूर्ण माहिती आपण येथे समजून घेणार आहोत . 

नुकसान झाल्याची तक्रार नोंदणी करण्याच्या पद्धती 

  1. विमा कंपनी ला फोन करून कळवणे . 
  2. लेखी अर्ज / जीमेल करून कळवणे . 
  3. क्रॉप इन्शुरेंस अप्प वरुण तक्रार नोंदणी करणे . 
मित्रांनो वरील पैकी कोणत्याही एका पद्धतीने तुम्हाला पीक नुकसान झाल्याची तक्रार ही नोंदवायची आहे . त्याची माहिती तुम्हाला खाली दिली आहे . 

फोन करून कसे कळवावे ? 

तुम्ही भरलेल्या विमा अर्जावर कंपनी चा मोबाईल नंबर आहे . त्यावर फोन नंबर वर तुम्हाला फोन करायचा आहे . व ते जे विचारतील ती सगळी माहिती तुम्ही सांगायची आहे . ही माहिती तुम्हाला 72 तासांच्या आत द्यायची आहे . 

लेखी अर्ज करून कसे कळवावे ? 

मित्रांनो लेखी  अर्ज साठी तुम्हाला जवळच्या विमा कंपनी ऑफिस ला जायचे आहे . तेथे तुम्हाला लेखी अर्ज हा करता येणार आहे . 

Crop insurance या अप्प वरुण तक्रार कशी नोंदवाल ? 

सगळ्यात आधी तुम्हाला हे अप्प डाउनलोड करायचे आहे . त्यानंतर तुम्हाला या अप्प वरुण तुमची माहिती भरून पिकांचे जागेवर फोटो पडून तक्रार नोंदणी करायची आहे . अधिक माहिती साठी कृषि सहायक यांच्याशी संपर्क साधू शकता .