नमस्कार मित्रांनो , या लेखामध्ये आपण घरकुल ड यादी कशी पाहायची ?(Gharkul D Yadi Kashi Pahaychi) व घरकुल योजनेचे नियम काय आहेत ? याची संपूर्ण माहिती आपण येथे समजून घेणार आहोत . प्रतेक योजनेच्या माहिती साठी आपले Maha योजना हे अप्प नक्की डाउनलोड करा .
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २०२२ मध्ये घरकुल यादी ही जाहीर करण्यात आली आहे . या योजनेत काही लोकांची नावे आली आहेत . तर काही लोकांची अर्ज भरून आणि पात्र असून सुद्धा नावे आलेली नाहीत . अश्या बऱ्याच त्रुटि घरकुल ड यादी मध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत .
मंजूर यादी कशी बघायची ? Gharkul D Yadi Kashi Pahaychi
यादी पाहण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करायच्या आहेत .

- वेबसाइट वर यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा .
- त्यानंतर तुम्हाला Awassoft मध्ये Report या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे .
- त्यानंतर तुम्हाला . Social Audit Reports मध्ये Beneficiary details for verification या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे .
- त्यानंतर तुम्हाला तुमच राज्य निवडायचे आहे .
- त्याच्याखाली जिल्हा निवडा .
- त्यानंतर तालुका निवडून घ्या .
- त्यानंतर ग्रामपंच्यात निवडायची आहे .
- योजनेचे वर्ष निवडा .
- योजनेचे भरभुर यादी असेल त्यातून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सिलेक्ट करायचे आहे .
- त्यानंतर दिलेले समीकरण सोडवायचे आहे . व भरायचे आहे .
- त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या ग्रामपंचायत / गावातील घरकुल ड यादी ही दिसणार आहे . सदारची यादी तुम्ही पीडीएफ मध्ये आणि ecxel फॉरमॅट मध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता . आणि इतरांना शेअर करू शकता .
मित्रांनो वरील प्रमाणे तुम्ही घरकुल ड यादी ही बघू शकता . मित्रांनो जर तुम्हाला तुमचे नाव हे ड यादीत आहे का नाही हे बघायचे असेल तर एक वेळेस ग्रामपंचायत मध्ये जावून तेथे ड यादी ही उपलब्ध आहे . त्या यादीमध्ये तुमचे नाव वेटिंग मध्ये सुद्धा असू शकते . अश्याच प्रकारच्या माहिती साठी आपल्या व्हातसप्प ग्रुप मध्ये नक्की सामील व्हा .
निवडीचे निकष / नियम
मित्रांनो घरकुल ड यादी ही खालील निकष / नियम वापरुन तयार करण्यात आली आहे .
- लाभार्थी कडे आधी पक्के घर नसाव. असल्यास त्यांना या योजनेतून वगळण्यात येईल .
- लाभार्थी कढे चारचाकी वाहन नसावे . असेल तर या योजनेमधून कमी करण्यात आले आहे .
- अर्जदार हा सरकारी नोकरी मध्ये नसावा . असेल तर अपात्र घोषित केले गेले आहे .
- इन्कम टॅक्स भरणारा अर्जदार अपात्र आहेत .
- २ पेक्षा जास्त खोल्या असतील तर घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही .
- अर्जदारकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे .
वरील घरकुल ड यादीचे काही नियम आहेत .