Kanda Chal Anudan Yojana 2022 | कांदा चाळ अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु

JSON Variables

Kanda Chal Anudan Yojana 2022 | कांदा चाळ अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु

 




Kanda Chal Anudan Yojana 2022 | कांदा चाळ अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु

Kanda Chal Anudan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कांदा उत्पादक शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी बांधवांना कांदा पीक घेत असताना येणाऱ्या विविध अडचणी मधील मोठी अडचण कांदा पिक साठवणूक. चांगल्या पद्धतीत न झालेल्यांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत, असते तरी याचाच विचार करून सरकारने शेतकऱ्यांसाठी कांदाचाळ अनुदान योजना हे Facebook सुरू केले आहे.

Kanda Chal Anudan Yojana 2022 लाभार्थी 

वैयक्तिक शेतकरी/खरेदी विक्री सहकारी संघ/कृषि उत्पन्न बाजार समित्या/कांदा उत्पादक सहकारी संस्था/विविध कार्यकारी सहकारी संस्था/पणन व प्रक्रिया सहकारी संस्था यांना या योजनेचा लाभ देण्यात येतील.

Kanda Chal Anudan Yojana 2022अनुदानाचा दर

कांदाचाळ बांधकामाचा महत्तम मर्यादा रु.6000/- प्रति मे.टन एवढी राहील. त्यांच्या 25 टक्के म्हणजे रु.1500/- प्रति मे.टन एवढे अनुदान देय राहील. अनुदान हे रु.1500/- प्रति मे.टन किंवा बांधकाम खर्चाच्या 25 टक्के जे कमी असेल ते लाभार्थीस देय राहील. 

Kanda Chal Anudan Yojana 2022अनुदानाची मर्यादा


वैयक्तिक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी रु.1,50,000/- अनुदान देण्यात येईल तर इतर सहकारी संस्था/कृषि उत्पन्न बाजार समित्या/कांदा उत्पादक सहकारी संस्था यांना जास्तीत जास्त 500 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळींसाठी रु.7,50,000/- एवढे अनुदान देण्यात येईल.

Kanda Chal Anudan Yojana 2022अनुदानासाठी अर्ज

कांदाचाळीचे बांधकाम करण्यापुर्वी संबंधीतांनी विहीत नमुन्यातील कांदाचाळीचा आराखडा व अर्ज संबंधीत कृषि उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावा. त्यानुसारच कांदाचाळीचे बांधकाम करणे बंधनकारक आहे. कांदाचाळीचे बांधकाम पुर्ण झाल्यानंतर विहीत नमुन्यातील कांदाचाळी अनुदानाचा यांच्या प्रस्ताव संबंधीत बाजार समिती यांच्या कार्यालयात खालील बाबीसह सादर करावा. अचूक व परिपूर्ण प्रस्ताव योग्य ती शहानिशा करुन स्विकृत करण्याची संपूर्ण जबाबदारी ही सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती यांची राहील.

Kanda Chal Anudan Yojana 2022 Documents

(अ) वैयक्तिक शेतकऱ्यासाठी :
1. विहीत नमुन्यातील अर्ज. 
2. अर्जदाराच्या नावे स्वत:च्या मालकीची जमिन असावी. 5 ते 50 मे.टन क्षमतेच्या कांदा चाळासाठी किमान एक हेक्टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी 1 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असावे. तशी कांदा पिकाची नोंद असणारा 7/12 उताऱ्याची प्रत, 8-अ खाते उतारा अर्जासोबत जोडावा. 
3. वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी देखील अनुदानास पात्र राहील, वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थीच्या बाबतीत कर्ज मंजूरचे आदेशपत्र सहपत्रीत करणे आवश्यक आहे. 
4. कांदाचाळीचा गैरवापर लाभार्थीकडून झाल्यास अनुदान दिलेल्या तारखेपासून व्याजासह वसूली लाभार्थीकडून करण्यात येईल. 
5. लाभार्थींनी कांदाचाळ बांधण्यापुर्वी याबाबत करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात रु.20 च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करुन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करावा. 
6. अर्जासोबत खर्चाची मुळ बिले व गोषवारा जोडावा. 
7. कृषि विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला जोडावा. 
8. अर्जदारासह कांदाचाळीचा फोटो जोडावा. 
9. सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येईल. 
(ब) सहकारी संस्थानी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल करण्याची पद्धत :
सहकारी संस्था, कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी कांदाचाळीचे काम चालू करणेपुर्वी कांदाचाळीबाबतचा प्रस्ताव पणन मंडळाचे मुख्य कार्यालये, पुणे येथे खालील बाबीच्या माहितीसह प्रस्ताव तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा. 
1. संस्थेने कांदा साठवणूक प्रकल्पाची उभारणी सुरु करणेपूर्वी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडे तत्वत: मंजूरीसाठी सादर करावा.
2. संस्थेमार्फत किती मे.टन क्षमतेच्या कांदाचाळी उभारणार याबाबत संस्थेच्या संचालक मंडळ सभेत पारीत करण्यात आलेल्या ठरावाची प्रत अर्जासोबत जोडावी. 
3. प्रकल्पासाठी संस्थेच्या नावे जागा असलेबाबत पुरावा (गाव नमुना क्र.7, 7-अ/12) अथवा करीता कमी 30 वर्षे लीजवर घेतलेली असल्यास त्याबाबतची कागदपत्रे. 
4. प्रस्तावीत जागेचा स्थळदर्शक नकशा. 
5. कांदा साठवणूक प्रकल्प उभारणीसाठी निधीचे नियोजन संस्था कशा रितीने उभारणी करणार याबाबत अर्जात स्पष्ट उल्लेख असावा.