पीएम किसान 11व्या हप्त्याची तारीख रिलीज 2022 || पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हप्ता या दिवशी उपलब्ध होईल
१२ कोटी ५० लाखांहून अधिक शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या ११व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या काही दिवसांतच या आर्थिक वर्षाचा पहिला हप्ता आणि योजनेच्या सुरुवातीपासूनचा ११वा हप्ता त्याच्या खात्यात जमा होईल. हप्त्याला उशीर होण्याचे कारण म्हणजे ई-केवायसी आणि पडताळणीचे काम गावोगाव सुरू आहे. भारतातील बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. शेतीचे सातत्याने नुकसान होत असल्याने अनेक अल्पभूधारक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते.
साधारणपणे 1 एप्रिल ते 31 जुलैदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा केला जातो. यासाठी आतापर्यंत 80 टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. शेतकऱ्यांची 11व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार असून केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 31 मे पर्यंत 11 वा हप्ता जमा होऊ शकतो, असा दावा सूत्रांनी केला आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलं नसेल, त्यांनी ते लवकरात लवकर करून घ्यावं.
ई-केवायसी कसं करायचं?
>> ई-केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावं लागेल.
>> तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्यात e-KYC चा पर्याय दिसेल.
>> तुम्हाला या e-KYC वर क्लिक करावं लागेल.
>> आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
>> यानंतर तुम्हाला इमेज कोड टाकावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावं लागेल.
>> नंतर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर टाकावा लागेल आणि OTP भरावा लागेल.
>> यानंतर, तुमची सर्व माहिती पूर्णपणे बरोबर असल्यास ही eKYC प्रक्रिया पूर्ण होईल.
>> तुमची प्रक्रिया चुकली असेल तर invalid असं स्क्रीनवर येईल.
>> चुकलेली किंवा अवैध माहिती तुम्ही आधार सेवा केंद्राला भेट देऊन दुरुस्त करवून घेऊ शकता.
तुम्हीदेखील पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि या योजनेचा हप्ता वेळेवर तुमच्या खात्यात जमा व्हावा, अशी तुमची इच्छा असेल तर ई-केवायसी पूर्ण करून घ्या.
