PM Kisan Registration – Apply online, New Farmer Registration Number
पीएम किसान नोंदणी – ऑनलाइन अर्ज करा, नवीन शेतकरी नोंदणी क्रमांक तपशील आणि पणजीकरणसाठी चरण-दर-चरण प्रक्रिया येथे तपासली जाऊ शकते. पीएम किसान नोंदणीबद्दलची सर्व माहिती तुम्हाला आमच्या लेखात उपलब्ध असेल, कृपया आमचा लेख काळजीपूर्वक वाचा. आमच्या लेखात, तुम्हाला नोंदणी, अर्ज, स्थिती तपासणे इत्यादींबद्दल स्पष्ट माहिती दिली जाईल आणि त्याच वेळी, या पोर्टलबद्दल संपूर्ण माहिती देखील दिली जाईल. आम्हाला माहित आहे की तुम्हा सर्वांना या पोर्टलबद्दल जाणून घ्यायचे आहे, म्हणून आम्ही तुम्हाला आमच्या आजच्या लेखात याबद्दल सांगू, कृपया आमचा लेख शेवटपर्यंत वाचा.
शेतकरी असाल तर लवकर भरा फॉर्म मिळतील 2000 रू. | पी एम किसान योजना नवीन अर्ज सुरु
पी एम किसान योजना नवीन फार्म सुरू लवकर करा अर्ज..
PM Kisan Samman Nidhi Yojana New Registration Start पीएम किसान सम्मान निधि योजना नवीन रजिस्ट्रेशन सुरू . शेतकरी असाल तर लवकर भर फॉर्म मिळतील 2000 रुपये.
शेतकरी योजना : पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत नवीन फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे. खूप दिवसा पासूनपी एम किसान सन्मान निधी योजना ची वेबसाईट बंद होती. तर त्या वेबसाईट मध्ये आता नवीनतम बदल करून पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला नसेल. ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत सन्मानित योजनेसाठी फॉर्म भरला नसेल अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नवीन रजिस्ट्रेशन करून घेणे आवश्यक आहे. तरस त्यांना पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत 2000 रु चा लाभ मिळेल.
पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 सन्माननिधी म्हणून दिले जातात. पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत आतापर्यंत एकूण आठ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. 9 वा हप्ता येण्याच्या तयारीत आहे. जर का ज्या शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केलेली नाही ते शेतकरी जर आता नवीन नोंदणी करतील तर त्यांना हा हप्ता मिळू शकतो.
Also check:
⏵पीएम-किसान गवा नुसार पेमेंट-स्थिती यादी 2022: सर्व शेतकऱ्यांची यादी जाहीर, पहा
⏵ PM किसान योजना: लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे येणार, पण या लोकांना मिळणार नाही!
⏵PM किसान योजना: शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी, हे काम न झाल्यास 11 वा हप्ता येणार नाही
असा करा अर्ज पी एम किसान योजनेसाठी
पी एम किसान योजनेसाठी नवीन अर्ज तुम्ही मोबाईलच्या साह्याने पण करू शकता व लॅपटॉप कॉम्प्युटर च्या साह्याने पण करू शकता. परंतु साधारण व्यक्तींना अर्ज करताना खूप अडचणी येतात आणि जर का फॉर्म चुकला परत अजून अडचणी येतात. त्यामुळे तुम्ही स्वतः फार्म न भरता खाली दिलेले कागदपत्र घेऊन सायबर कॅफेवर जाऊन फॉर्म भरू शकता. जेणेकरून फॉर्म भरतांना कोणत्याही प्रकारची गफलत होणार नाही आणि तुम्हाला लवकरात लवकर पी एम किसान सन्मान निधी चे पैसे मिळतील.
पीएम किसान सम्मान निधि योजना साठी लागणारी कागदपत्रे.
1) आधार कार्ड
2) बँक पासबुक
3) सातबारा उतारा
4) रेशन कार्ड नंबर
5) मोबाईल नंबर
पी एम किसान ची नवीन वेबसाईट आताच सुरू झाल्यामुळे खूप शेतकऱ्यांना ही वेबसाईट चालू झाली असे माहित नाहीये. त्यामुळे तुमच्या ओळखीच्या शेतकरी बंधूंना ही माहिती नक्की कळवा. ती माहिती खूप कमी लोकांना माहीत आहे त्यामुळे तुमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये शेअर करायला विसरू नका.
* ऑनलाईन नोंदणी कशी करायची? PM Kisan Regisrtation Maharashtra
1 - ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला pm kisan असं गुगलवर सर्च करावं लागेल.त्यानंतर PM-Kisan Samman Nidhi ची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.
2 -त्यानंतर उजवीकडे तुम्हाला ‘फार्मर कॉर्नर’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केलं की 10 पर्याय तुमच्यासमोर येतात. त्यातील पहिलाच पर्याय आहे New Farmer Registration.या पर्यायावर क्लिक केलं की ‘New Farmer Registration form‘ नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
Official Website - Click Here
3--इथं तुम्हाला आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.
मोबाईल नंबर वरती एक OTP पाठवला जाईल
त्यानंतर मोबाईल वर आलेला OTP टाकून घ्यायचा आहे.
4- त्यानंतर Captcha कोड आहे तसा टाकून घ्याचं म्हणजे तुम्ही रोबोट किंवा यंत्र नाही, तर माणूस आहात, हे तुम्हाला तुम्ही ज्या मशीनवर फ़ॉर्म भरता त्या मशिनीला (फोन किंवा कॉम्प्युटर) पटवून द्यायचं असतं. त्यासाठी Captchaमधील आकडेवारी किंवा अक्षरं जशीच्या तशी समोरच्या रकान्यात लिहायची असतात.
Captcha टाकल्यानंतर Submit बटन वर क्लिक करावे.
5- त्यानंतर रेजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये सुरुवातीला शेतकऱ्याला वैयक्तिक माहिती भरायची आहे.
6- यात सुरुवातीला State म्हणजे राज्य निवडायचं आहे, त्यानंतर District म्हणजे जिल्हा निवडायचा आहे. पुढे Sub-district आणि Block या दोन्ही ठिकाणी तुमच्या तालुक्याचं नाव निवडायचं आहे. आणि मग गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे.
7- त्याखाली Farmer Name म्हणजे शेतकऱ्याचं नाव लिहायचं आहे. इथं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आधार कार्डवर तुमच्या नावाची स्पेलिंग जशी लिहिलेली असते, तशीच स्पेलिंग इथं नाव टाकताना लिहायची आहे. एक जरी इंग्रजी शब्द इकडे तिकडे झाला, तर तुमचा फॉर्म पूर्ण होऊ शकत नाही.
8- पुढे लिंग निवडायचं आहे (मेल, फिमेल की अदर्स) आणि मग तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडता (जनरल, एससी, एसटी की इतर) ते निवडायचं आहे.
9 - त्यानंतर फार्मर टाईप मध्ये शेतकऱ्याचा प्रकार निवडायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे 1 ते 2 हेक्टरदरम्यान शेती असेल तर तुम्हाला पहिल्या पर्यायावर क्लिक करायचं आहे, जास्त असेल तर अदर या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
10- आपण नोंदणीसाठी आधार क्रमांक दिलेला असल्यामुळे एक Identity Proof Number आपोआप जनरेट होतो.
11- आता पुढे तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहिती भरायची आहे. यामध्ये बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. हा कोड तुमच्या बँक पासबुकवर दिलेला असतो. त्यानंतर बँकेचं नाव टाकायचं आहे आणि मग खाते क्रमांक टाकायचा आहे.
12 -त्यानंतर पत्ता टाकयचा आहे.
13- पुढे जमिनीचा खाते क्रमांक आणि रेशन कार्ड टाकून झाला की, तुम्हाला Submit for Adhar authentication या पर्यायावर क्लिक करायचं आहे.या पर्यायावर क्लिक केलं, की “Yes, Aadhar Authenticated Succesfully” असा लाल अक्षरात मेजेस तिथं येतो. याचा अर्थ तुमचं आधार प्रमाणीकरण यशस्वीरित्या झालं आहे.
14- त्यानंतर Land Holding मध्ये जमिनीच्या मालकीचा प्रकार सांगायचा आहे. यात स्वत: एकट्याच्या मालकीची जमीन असेल, तर Single या पर्यायावर क्लिक करायचं आहे.आणि सामूहिक मालकीची शेतजमीन असेल तर joint या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
15- त्यानंतर Add या पर्यायावर क्लिक करून शेतजमिनीची माहिती सांगायची आहे.आता इथं तुम्हाला सर्व्हे किंवा खाता नंबरमध्ये सातबाऱ्यावरील आठ-अ चा जो खाते क्रमांक आहे, तो टाकायचा आहे. त्यानंतर खासरा किंवा डॅगमध्ये सातबाऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुमच्याकडे किती शेतजमीन आहे, ते हेक्टरमध्ये लिहायचं आहे. सातबाऱ्यावर जितकी जमीन नोंदवलेली आहे, तो आकडा इथं टाकायचा आहे. हे टाकून Add बटन दाबलं की तुमच्या माहितीची तिथं नोंद केली जाते.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीचा खाते उतारा, आधार कार्ड आणि बँक पासबुक हि कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
16- ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर “I certify that all the given details are correct” याचा अर्थ मी दिलेली सगळी माहिती खरी आहे, या पर्यायासमोरच्या डब्ब्यात टीक करायचं आहे
17 -त्यानंतर तुम्ही Self -Declaration Form* वर क्लिक करून तिथं दिलेली माहिती वाचू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, करदाते नाही याबद्दलची माहिती त्यात दिलेली असते.
18- सगळ्यात शेवटी सेव्ह या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर स्क्रीनवर एक मेसेज येईल. त्यावर लिहिलेलं असेल की, *****हा तुमचा identity proof number आहे आणि तुम्ही यशस्वीरित्या नोंदणी केली आहे. पुढील मंजूरीसाठी ही माहिती राज्य सरकारकडे पाठवली जाईल. ही माहिती समाधानकारक असेल, तर योजनेसाठी तुमचा विचार केला जाईल, अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाईल.