SBI ATM मधून पैसे काढण्याची नियम बदलले; जाणून घ्या अन्यथा अडचणीत याल

JSON Variables

SBI ATM मधून पैसे काढण्याची नियम बदलले; जाणून घ्या अन्यथा अडचणीत याल



मित्रांनो, whatsapp ग्रुप Join करा

SBI ATM Withdrawal New Rules 2022; एटीएम मधून पैसे काढण्याचे नियम बदलले, हे काम केल्याशिवाय आता एटीएम मधून पैसेच निघणार नाहीत

SBI ATM Withdrawal New Rules 2022: देशातील सरकारी सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आता आपल्या ग्राहकांची कसल्याच प्रकारे फसवणूक होऊ नये म्हणून एक नवीन नियम अमलात आणला आहे. तुम्ही देखील हा नियम नक्की जाणून घ्या नाहीतर तुम्ही खूप अडचणीत येऊ शकतात. हा नियम स्टेट बँक ऑफ इंडिया सर्व ग्राहकांसाठी अनिवार्य केलेला आहे.


 SBI ATM Withdrawl Rule Changed | तुम्हीही पैसे काढण्यासाठी नियमित  एटीएमचा वापर करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी. एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. 

आता तुम्हाला SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल. आता नवीन नियमानुसार, ग्राहक ओटीपीशिवाय पैसे काढू शकत नाहीत. रोख रक्कम काढण्याच्या वेळी, ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर एक ओटीपी प्राप्त होतो, तो प्रविष्ट केल्यानंतरच एटीएममधून पैसे काढता येतात.

एका ट्विटमध्ये माहिती देताना बँकेने म्हटले आहे की, 'एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी आमची ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध परिणामकारक ठरणारी आहे. फसवणुकीपासून खातेधारकांचं संरक्षण करणे हे नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल. 

हे नियम 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रकमेवर लागू आहेत. 10 हजारावरील रक्कम काढण्यासाठी ओटीपी टाकावा लागणार आहे.

नवीन नियम जाणून घ्या

SBI ATM Withdrawal New Rules 2022: एसबीआयच्या एटीएम मधून पैसे काढण्याच्या नवीन नियमानुसार, आता ग्राहकांना ओटीपी शिवाय पैसे काढता येणार नाहीत म्हणजेच 10 हजार रुपये किंवा त्याहून 10 हजार रुपयांहून अधिक रक्कम काढताना ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर एक OTP प्राप्त होतो तो प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला एटीएममधून पैसे काढता येतील.