Government scheme : शरद पवार ग्राम समृद्धी योजना सुरू मिळणार १००% अनुदान नवीन अर्जाला सुरुवात तात्काळ आपला अर्ज करा 2022
{अर्ज डाउनलोड} शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 शरद पवार ग्राम समृद्धी योजना(sharad pawar gram samridhi yojana form)Gā'ī gōṭhā anudāna
ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्याला वैयक्तिक व सार्वजनिक कामे हाती घेऊन
त्याद्वारे कायमस्वरुपी मत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व
कामाअभावी होणारे स्थलांतर थांबविणे हा उद्देश आहे. या कामांसाठी आवश्यक असणारे
६०:४० अकुशल-कुशल कामगारांचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण
रोजगार हमी योजनेच्या विविध योजनांच्या जसे की, शेततळे, वृक्ष लागवड, शोषखड्डे,
फळबाग लागवड, इत्यादी अकुशल खर्चाचे प्रमाण जास्त असलेल्या योजनांच्या संयोजनातून
या बाबी दिल्याने प्रत्येक शेतकरी समृद्ध (लखपती) होतील, असा योजनेचा उद्देश आहे.
आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई,म्हशी,शेळी, कोंबड्या असतात पण
त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाच ठिकाण नसत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन वारा
पाऊस यांच्यापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात व
त्याच्यासमोर जनावरांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते
त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला गाय गोठा अनुदान योजना हि अत्यंत उपयुक्त ठरते.
या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवाना गाय,म्हशी,शेळी,कोंबड्या यांना पक्क्या
स्वरूपाचा गोठा व शेड बनविण्यासाठी अनुदान दिले जाते.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या
एकत्रीकरणातून हि योजना राबविण्यात येत आहे.
गाय गोठा योजनेचा उद्देश
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे व त्यांना समृद्ध करणे हे उद्दिष्ट
समोर ठेवून गाय म्हैस गोठा अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध नाही परिणामी
त्यांना स्थलांतर करून नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी वास्तव्यास जावे लागते
त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराची संधी
उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
केंद्राच्या मनरेगा योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेशी जोडला
जाणार आहे.
गाय गोठा योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान
💥 गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे:
★ अकुशल खर्च रु. 6,188/- (प्रमाण 8 टक्के)
★ कुशल खर्च रु.71,000/- (प्रमाण 92 टक्के)
★ एकूण रु.77,188/- (प्रमाण 100 टक्के)
💥 शेळीपालन शेड बांधणे: अकुशल खर्च रु. 4,284/- (प्रमाण 8 टक्के)
★ कुशल खर्च रु.45,000/- (प्रमाण 92 टक्के)
★ एकूण- रु.49,284/- (प्रमाण 100 टक्के) ) कुक्कुटपालन शेड बांधणे, अकुशल खर्च
रु. 4,760/- (प्रमाण 10 टक्के) कुशल खर्च रु.45,000/- (प्रमाण 90 टक्के)
★ एकूण- रु.49,760/- (प्रमाण 100 टक्के)
💥 भूसंजीवनी नाडेप कंपोस्टिंगः अकुशल खर्च रु. 4,046/- (प्रमाण 38 टक्के) कुशल
खर्च रु. 6491/- (प्रमाण 62 टक्के) एकूण रू.10,537/- (प्रमाण 100 टक्के
गाय गोठा योजनेचा लाभ
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधून
देण्यात येतो
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला शेळीपालनासाठी शेड बांधून देण्यात येते
लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत कुकूट पालनासाठी शेड बांधून देण्यात येते.
लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत भू संजीवनी नाडेप कंपोस्टिंग साठी अनुदान
देण्यात येते.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्यास मदत होते
या योजनेमुळे गावाचा व शेतकऱ्यांचा विकास होण्यास मदत होते.
गाय गोटा योजनेच्या अटी
या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक
आहे
प्रत्येक योजनेच्या अनुदानासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
उपलब्ध पशूंचे जीपीएस मध्ये टायपिंग करणे आवश्यक
या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील लोकांनाच घेता येईल.
या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांना घेता येईल.
गाय गोठा योजनेंतर्गत आवश्यक कागदपत्रे
★अर्जदाराचे आधार कार्ड
★रेशन कार्ड
★अर्जदार शेतकरी असणे आवश्यक
★अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
★अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
★अर्जदाराचे मतदान कार्ड
★मोबाईल क्रमांक
★अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक (15 वर्षाच्या वास्तव्याचा दाखला
असणे आवश्यक)
★अर्जदार ग्रामीण भागात राहणारा रहिवासी असावा.
★आदिवासी प्रमाणपत्र
★जन्माचे प्रमाणपत्र
★जातीचे प्रमाणपत्र
★या योजनाआधी शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्याचा लाभ न
घेतल्याबद्दल घोषणापत्र जोडणे आवश्यक.
★ज्या जागेत शेड बांधण्यात येणार आहे त्या जागेत अर्जदाराचे सह-हिस्सेदार
असल्यास त्यांचे संमतीपत्र / ना
हरकत प्रमाणपत्र.
★ग्रामपंचायत शिफारस पत्र
★अर्जदाराकडे अल्पभूधारक प्रमाणपत्र असणे आवश्यक
★अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षक,सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध
प्रमाणपत्र असणे आवश्यक.
अर्जदाराकडे कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र व जॉब कार्ड
असणे आवश्यक.
★अर्जदारांना जनावरांसाठी गोठा/शेड बांधण्याचे अंदाजपत्रक सोबत जोडणे आवश्यक
आहे.
गाय गोठा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदाराने आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात
जाऊन गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा व त्या अर्जात विचारलेली सर्व माहिती
भरून योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा.
गाय गोठा योजनेअंतर्गत अर्ज कसा भरावा
Gā'ī gōṭhā anudāna
या योजनेचा अर्ज आपण सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या पैकी
कोणाकडे करत आहोत त्याच्या नावावर बरोबरची खूण करावी.
त्याखाली आपल्याला ग्रामपंचायतीचे नाव, स्वतःचा तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे
अर्जदाराने स्वतःचे नाव,स्वतःचा पत्ता, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक
भरायचा आहे.
अर्जदार ज्या प्रकारासाठी अर्ज करणार आहे त्या समोर बरोबरची खूण करायची आहे.
अर्जदाराने स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे व अर्जदार जो प्रकार निवडेल
त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोडायचे आहे.Gā'ī gōṭhā anudāna
लाभार्थ्याच्या नावे जमीन असल्यास हो लिहावे व ७/१२ व ८ अ आणि ग्रामपंचायत
नमुना ९ जोडायचा आहे.
लाभार्थ्याला गावचा रहीवाशी पुरावा जोडायचा आहे.
तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का ते
सांगायचे आहे.
त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे त्यासोबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या
सहीच एक शिफारस पत्र द्यावे लागणार आहे त्यात लाभार्थी सदर योजनेचा लाभ
घेण्यासाठी पात्र असल्याचे सांगितले जाईल.
त्यानंतर लाभार्थ्याच्या कागदपत्रांची छाननी करून अर्जदाराला पंचायत समितीच्या
अधिकाऱ्यांच्या सही शिक्या नुसार पोचपावती दिली जाईल.Gā'ī gōṭhā anudāna
